क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाने २०२१-२२ आणि २०२२-२३ या वर्षासाठी राज्य युवा पुरस्कार देण्यासाठी युवा आणि विकास कार्य क्षेत्रात प्रशंसनीय सेवा बजावलेल्या सक्रिय आणि कार्यक्षम व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये, युवा क्लब आणि स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज मागविले आहेत.
१५ ते २९ वयोगटातील तरुण वैयक्तिक पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्जाच्या नमुन्यासह पात्रतेसाठी इतर संबंधित नियम आणि अटी क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाच्या www.dsya.goa.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आल्या आहेत. इच्छुकांनी त्या डाउनलोड करू घ्याव्या.
पात्र युवक, स्वयंसेवी संस्था आणि इतरानी पूर्ण भरलेले अर्ज, केलेल्या सेवेचे प्रमाणपत्र आणि संबंधित कागदपत्रांसह ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाच्या कार्यालयात सादर करावे. उशीरा पोचलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.