डीवायएसपी श्री जीवबा दळवी यांचा तापोभूमीवर गौरव

  पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजीच्या पावन हस्ते गौरव.

  0
  18

  हिन्दू धर्माचे संस्कार लहान पिढीपर्यंत पोचवणं ही आजच्या काळाची गरज आहे माझ्याही मुलीला संस्कार शिकविण्याचे कार्य मी माझ्या घरात करतो असे उदगार श्री जिवबा दळवी यांनी श्री क्षेत्र तपोभूमीवर काढले
  धर्मभूषण सद्गुरू ब्रम्हेशानंद स्वामीजींची सेवा ज्या ज्या वेळी विविध कार्यामध्ये करण्याची संधी प्राप्त झाली ती सेवा मी मनोभावे केलेली आहे व पू. स्वामीजिंचे आशीर्वाद प्राप्त झाले आहेत.
  सर्व सरकारी कर्मचारी यांनी एक विशिष्ठ वय झाल्यानंतर फक्त आठ तासाची ड्यूटी न करता देशसेवेसाठी पुढाकार घेतला पाहिजे असे पुढे म्हणाले
  पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरू ब्रम्हेशानंदाचार्य स्वामीजींच्या पावन अधिष्ठना खाली गोवा सरकारी कर्मचारी संघटना यांच्या यजमानपदा खाली दत्तगुरुवार कार्यक्रमात पू. स्वामीजींच्या पावन हस्ते जीवबा दळवी यांचा गौरव करण्यात आला व पुढील वाटचाली साठी पू. स्वामीजींचे गौरव स्वरूप आशीर्वाद प्राप्त झाले .

  Click to rate this post!
  [Total: 0 Average: 0]